Monday, April 18, 2016

आजोबा...

आजोबा - आमचे नाना आजोबा
उंच, ताठ, सदपातळ बांधा,
पांढरे शुभ्र केस - अन् पांढरे शुभ्र च धोतर.
Extremely disciplined.
आई म्हणते - "भाजी कितीही आवडती असो -
रोजची त्यांची ठरलेली - अर्धीच खायचे भाकर..."
काका म्हणतो - "आमच्या लहानपणी खूप होते ते रागीट...
पत्त्यांचा डाव दिसतच - टाकून द्यायचे बम्बा च्या आगीत!"
मला मात्र आठवत नाहीत कधीच ते चिडलेले...
मला आठवतात - शांत आबा - मला फिरायला घेऊन जाणारे...
शाळेतला result घ्यायला जाता जाता - हात मी पटकन दिला सोडून...
अन् येणार्‍या बाइक सोबत accident बसला होऊन...
तेव्हा सुद्धा आठवते - केला नाही त्यांनी त्रागा -
शांतपणे जवळ घेऊन म्हणाले, " खूप लागले आहे का बाळा? "

माझे आजोबा - आमचे आण्णा
त्यांच्या साठी अन् त्यांच्या बद्द्ल लिहावे तितके थोडेच...
मला ते फारसे आठवत नाहीत - पण त्यांच्या गोष्टी ऐकून वाटते -
खरच असणारच ते इथे - आमच्या सगळ्यांसोबत!
प्रत्येक decision - as if - guide करत...
आणि ते असतील बघत - म्हणूनच जाणवते एक अनामिक बळ...
एक अनामिक ओढ - दिलखुलास जगायची - खूप खूप शिकायची!

आजोबा - उगार चे आजोबा
हसत खेळत - जोक्स सांगत - chess च्या moves शिकवणारे...
दर सुट्टीत - ह्या वेळी हरवणार का मला - असा challenge देणारे!
रोज लाइब्ररीत जाऊन पुत्सक बदलून आणणारे -
अन् मला - कोणते नवीन पुस्तक वाचलेस - सांग बघू -
अस excitedly विचारणारे!

आजोबा - अनू चे आजोबा.
बॅडमिंटन चा आमचा डाव चालू असताना -
असायचे ते बाजूला फेर्‍या मारीत - अंगाणातल्या बेंच वर पेपर वाचत...
संध्याकाळ होताच - "लवकर आत या पोरांनो, नाहीतर डास येतील..." अशी हळूच हाक मारत.
पण आम्ही काही जायचो नाही लवकर - तेथेच असायचो खेळत दारात ...
मग काय - डास यायचेच invariably त्यांचा घरात...
आजोबांना asthma, आजी स्वयंपाक घरात -
मग आलेल्या डसांशी आम्ही करायचो दोन हात - त्यांच्या वर मारायचो आम्ही 'Flit' मन मुराद!
खुर्चीवर, कॉट वर, पन्ख्या च्या पात्या वर - दारात अन् खिडकीत -
"We made sure every mosquito was hit!"

आजोबा - अदिती चे आजोबा
बुधवार दुपार चे आजी चे दासबोध मंडळ
सगळ्या आज्यांचे चाले मनोभावे भजन - वाचन...
आम्ही मुले मात्र करत असू अजोबान्शी संभाषण...
आजोबांचे श्रवण यंत्र कसे चालते याचे वाटे - त्या वेळी भलतेच attraction!
खूप खूप गप्पा, खूप खूप गोष्टी - यात मस्त पैकी रमायचो -
आणि पुढया वेळी पुन्हा येऊ म्हणत - दर बुधवारी घरी परत निघायचो...

आजोबा - लट्टू आजोबा.
सुरांची अजिबतच ओळख नसलेल्या मला - पेटी वाजवायला शिकवणारे...
S/W Engg शिकते म्हणल्यावर - त्यांच्या संस्थेचे 'project' करून बघा सुचवणारे...
Second year च्या आम्हा मुलांवर केवढा तो विश्वास दाखवणारे!
"भातुकलीच्या खेळा मधले" गाणे शिकवणारे - आज सुद्धा भेटले की -
Conveyance Deed & Society bylaws हे माहिती हवेच असा आग्रह धरणारे...
दर वेळी भेटले की नवीन काही positive शिकवणारे!

ह्या सगळ्यांचीच आज कुणास ठाऊक का -
खूप खूप आठवण आली ...
आणि आजोबांची काठी घेऊन - हळूच एक चक्कर मारली -
आठवणींच्या गावी...

~Written on 17th April 2016 #Original