तू माझी आजी आणि मी तुझी नात
हे तर मला ठाऊक आहे जन्मजात...
पण आजकाल कधीकधी वाटते -
मी तुझी आजी आणि झाली आहेस तूच माझी नात!
बटाटेवड्यांचा जेव्हा तू धरतेस हट्ट -
मी म्हणते, "अग, कालच पोट होते ना थोडे डब्ब?"
तुला लागतो kindle वरचा largest font निर्विवाद
आणि माझी fav आहे पाटी पेन्सिल - तुझ्याशी साधण्यास संवाद...
म्हणूनच आजकाल कधीकधी वाटते -
मी तुझी आजी आणि झाली आहेस तूच माझी नात!
तू वाचतेस Obama आणि Fountainhead
मी तुझ्यासाठी आणते - दैनंदिन उपासना, गाथा आणि दासबोध!
तुला हवी असते मिनीबाकरवडी, चकली व भेळ
मी म्हणते, "आपण खाऊयात पोहे, दूध आणि केळ..."
अशा वेळी वाटते -
मी तुझी आजी आणि झाली आहेस तूच माझी नात!
पण तू अस्वस्थ असताना, तुला काही त्रास होत असताना सुद्धा
जेव्हा तू विचारतेस, "आज इथे झोपशील,
तर सापडेल ना extra पांघरूण-उशी ? "
मला जाणवते तुझ्या मनातील केवढी ती काळजी!!
जेव्हा तुला फुंकून भरवताना घास, तू पटकन म्हणतेस कशी -
"अग गरम आहे, भाजेल तुला- खाली धार एखादी बशी..."
तेव्हा एकदम जाणवते -
तुझ्या एवढी माया,
तुझ्या इतके प्रेम,
तुझ्यात असलेला एवढा जिव्हाळा -
खरच, नाही ग माझ्या पाशी - कशी होईन मग मी तुझी आजी!
आणि मग वाटते बरेच झाले -
आहे मीच तुझी नात आणि तूच माझी आजी!
~Written on 1st Oct 2017 #Original