I have spent the better part of the weekend catching up with and pestering my friends :D
And I know Friendship Day is still a few months away, but I am sure they will hear me out :)
Rattling off...
कधीतरी - अचनाकच -
एखादी दुखरी - खुपरी जखम दाखवून,
"फुंकर मारशील का जरा?", असे हक्काने विचारावे
आणि हातातील काम टाकून -
त्याने ही अलगद गोंजारवे ...
...अशी फुंकर म्हणजे मैत्री...
कधीतरी - अचनाकच -
गमती - जमतीत, हसता - हसता डोळ्यांत पाणी तरळावे,
आणि विनाकारण रडू कोसळावे -
कारण कळून त्याने लगेच - "होते मलाही असे कधीतरी" म्हणत अश्रू पुसवेत
...अशीच गंमत म्हणजे मैत्री...
कधीतरी - अचनाकच -
चालता चालता ठेचकाळावे - आणि धडपडायच्या अगोदर -
त्याने लगेच सावरावे
...अशी जागा म्हणजे मैत्री...
कधीतरी - अचनाकच -
कॅंटीन मधल्या लोणच्याची फोड चाखावी,
आणि जिभेवर रेंगाळावी त्याच्या डब्यातल्या लोणच्याची चव
...अशी फोड म्हणजे मैत्री...
कधीतरी - अचनाकच -
बदलांना सामोरे जाताना - उडावा थरकाप,
पुढचे सगळे धूसर - अंधूक - कसा करावा प्रवास?
पाठीवर देत थाप, त्याने म्हणावे - "चल की - बघतोयस कशाची वाट?"
...अशीच थाप म्हणजे मैत्री...
अशीच फुंकर - अशीच गंमत,
अशीच जागा - अशीच फोड,
अशीच थाप - कायम देणार्या माझ्या सगळ्यांना -
"I miss you, यार"
~Written on 19th June 2017 #Original
Translation pls :)
ReplyDeleteWaah Purva... Maastch... I miss you too, yaar..
ReplyDelete